30 "म्हणून, सार्वभौम याहवेह जाहीर करतात, तुम्ही अहो इस्राएल लोकहो, मी तुम्हा प्रत्येकाचा तुमच्या स्वतःच्या कृत्यांनुसार न्याय करेन. पश्चात्ताप करा! तुमच्या सर्व पापांपासून दूर वळा; म्हणजे तुमचे पाप तुमच्या पतनाचे कारण होणार नाही. 31 तुम्ही केलेले सर्व अपराध दूर टाकून द्या आणि नवीन हृदय व नवीन आत्मा घ्या. इस्राएल लोकहो, तुम्ही का मरावे? 32 कारण कोणाच्याही मरणाने मला आनंद होत नाही, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. पश्चात्ताप करा आणि जिवंत राहा!
Publicidade
Publicidade