11 " ‘कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: मी स्वतः माझ्या मेंढरांचा शोध करेन आणि त्यांची काळजी घेईन. 12 मेंढपाळ जेव्हा आपल्या मेंढरांमध्ये राहून पांगलेल्या मेंढरांची काळजी घेतो, तसेच मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन. ढगाळ व अंधकाराच्या दिवसात ते पांगून गेले त्या सर्व ठिकाणातून मी त्यांना सोडवेन. 13 राष्ट्रांतून मी त्यांना आणेन आणि देशांमधून त्यांना एकवट करेन आणि मी त्यांना स्वदेशात आणेन. इस्राएलच्या डोंगरांवर, ओहोळात व देशाच्या सर्व वस्त्यांमध्ये मी त्यांना चारीन. 14 मी त्यांना उत्तम कुरणात पाळीन आणि इस्राएलच्या डोंगरांचे माथे त्यांची चरण्याची ठिकाणे होतील. तिथे ते चांगल्या कुरणात बसतील आणि तिथे इस्राएलच्या डोंगरांवर सर्वोत्तम कुरणात चरतील. 15 मी स्वतः माझ्या मेंढरांना पाळीन आणि त्यांना विसावा देईन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात. 16 जे हरवले आहेत त्यांचा शोध मी करेन आणि भटकून गेलेल्यांना मी परत आणेन. जखमी झालेल्यांची पट्टी करेन आणि दुबळ्यांना शक्ती देईन, परंतु पुष्ट व बलवानांना मी नष्ट करेन. मी कळपाला न्यायाने पाळीन.
यहेज्केल 34:11-16
Em outras traduções
- IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi
11 कारण प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी स्वत:च आपल्या कळपाचा शोध घेईन आणि मी त्यांची काळजी घेईन, 12 जो मेंढपाळ आपल्या पांगलेल्या मेंढ्यांबरोबर राहून त्यास शोधतो, तसाच मी आपली मेंढरे शोधीन आणि आभाळाच्या व अंधकाराच्या दिवशी त्यांची पांगापाग झाली त्या सर्व ठिकाणाहून मी त्यांना सोडवीन. 13 मग मी त्यांना लोकांतून काढून आणीन. देशातून त्यांना एकत्र करीन व त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलाच्या पर्वताच्याबाजूला, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी कुरणात चारीन. 14 मी त्यांना चांगल्या कुरणांत ठेवीन. त्यांचे कुरण इस्राएलाच्या डोंगरावरील उंच ठिकाणी होईल; तेथे ती चांगल्या कुरणात पहुडतील. इस्राएलाच्या डोंगरावर ती उत्तम हिरवळीवर त्या चरतील. 15 मी स्वतः माझा कळप चारीन व त्यांना विश्रांती देईन, असे प्रभू परमेश्वर, म्हणतो. 16 हरवलेल्या मेंढ्यांचा मी शोध घेईन व भटकलेल्यांना मी परत आणीन. जे मोडलेले त्यास मी पट्टी बांधीन आणि रोगी मेंढीस बरे करीन. व मी पुष्ट व बलिष्ट यांना नामशेष करीन. त्यास मी यथान्याय चारीन.
Direitos das traduções citadas
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.