9 म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले
आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
10 यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,
स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
11 परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल
की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.