13 वास्तविक माझ्या शारीरिक आजारात मी तुम्हाला प्रथम शुभवार्तेचा प्रचार केला होता. 14 माझ्या शारीरिक आजाराने जणू तुमची परीक्षा झाली, तरी तुम्ही माझा धिक्कार व अवमान केला नाही. उलट तुम्ही माझे स्वागत केले, जणू काही मी परमेश्वराचा दूत, किंवा स्वतः ख्रिस्त येशूच होतो.