ख्रिस्ताचा आत्मयज्ञ एकदाचा व अखेरचा
1 नियमशास्त्र ज्या येणार्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची छाया आहे—त्याचे खरे स्वरूप नाही. या कारणासाठी ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्या त्याच यज्ञांनी उपासनेसाठी येणार्यांना परिपूर्ण करण्यास केव्हाही समर्थ ठरत नाही. 2 तसे झाले असते, तर एकच अर्पण पुरेसे नव्हते काय? उपासक कायमचे शुद्ध झाले असते तर त्यांची दोषाची भावना नाहीशी झाली असती. 3 पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. 4 कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.