धीराने विश्वासात टिकून राहण्यासाठी आवाहन
19 म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते. 20 आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे. 21 आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत, 22 म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.