23 आपण न डगमगता आपल्या आशेचा भरवसा दृढ धरू; कारण ज्यांनी वचन दिले ते विश्वसनीय आहेत. 24 आणि प्रीती व चांगली कृत्ये करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांना प्रेरित करू या. 25 आपण कित्येकांच्या सवयीप्रमाणे आपले एकत्रित मिळणे न सोडता एकमेकांना उत्तेजन द्यावे आणि तो दिवस जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते म्हणून तसे एकत्रित मिळून एकमेकांना अधिक उत्तेजन द्यावे.