3 पण त्यांनी त्यांच्या पापांची प्रतिवर्षी त्यांना आठवण करून दिली. 4 कारण बैलांचे व शेळ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.
5 यास्तव, जेव्हा ख्रिस्त जगात आले तेव्हा ते म्हणाले,
"यज्ञ किंवा अर्पणे यांची इच्छा तुम्हाला नाही,
परंतु तुम्ही माझ्यासाठी एक शरीर तयार केले;
6 होमार्पण व पापार्पण यांनी
तुम्हाला संतोष झाला नाही.
7 मग मी म्हणालो, ‘मी येथे आहे; शास्त्रलेखात माझ्याविषयी लिहिले आहे,
हे माझ्या परमेश्वरा तुमची इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’ "10:7 स्तोत्र 40:6-8
8 ते प्रथम म्हणाले, "बली आणि दाने, होमार्पणे आणि पापार्पणाची तुम्हाला इच्छा नाही व त्यात तुम्हाला संतोष नाही;" जरी ते नियमानुसार अर्पण करत होते. 9 नंतर ते म्हणाले, "हा मी येथे आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे." दुसरी व्यवस्था स्थापन करून त्यांनी पहिली व्यवस्था रद्द केली. 10 आणि त्या इच्छेद्वारे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह बलिदानाद्वारे पवित्र केलेले आहोत.