Pular para o conteúdo
Publicidade

इब्री 10:32-39

32 जेव्हा तुम्हाला प्रथम प्रकाश मिळाला तेव्हा तुम्हाला भयंकर दुःखसहनाने भरलेला संघर्ष करावा लागला याची आठवण करा. 33 कित्येकदा सार्वजनिक रीतीने तुमचा अपमान व छळ झाला; तर कधी अशाच गोष्टी सहन करणार्‍यांबरोबर तुम्ही जोडीने उभे राहिला. 34 बंदिवानांबरोबर तुम्ही दुःख सोसले आणि अधिक चांगली व टिकाऊ मालमत्ता आपल्याजवळ आहे हे समजून तुम्ही स्वतःच्या मालमत्तेची जप्ती आनंदाने स्वीकारली. 35 तुमचा विश्वास सोडू नका, त्याचे मोठे प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे.

36 तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे. 37 कारण,

"अगदी थोड्या वेळात,

जो येणार आहे तो येईल

आणि उशीर करणार नाही."10:37 यश 26:20

38 आणि,

"माझा नीतिमान विश्वासाने जगेल.

आणि माघार घेणार्‍यामध्ये

मला संतोष वाटणार नाही."10:38 हब 2:4

39 माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.