37 कारण,
"अगदी थोड्या वेळात,
जो येणार आहे तो येईल
आणि उशीर करणार नाही."10:37 यश 26:20
38 आणि,
"माझा नीतिमान विश्वासाने जगेल.
आणि माघार घेणार्यामध्ये
मला संतोष वाटणार नाही."10:38 हब 2:4
39 माघार घेणार्यातील आणि नाश होणार्यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.