5 आणि तुम्हाला उद्देशून पिता आपल्या पुत्रास बोलतो ते परमेश्वराचे उत्तेजनाचे शब्द विसरलात काय? ते म्हणाले,
"माझ्या पुत्रा, प्रभूच्या शिस्तीकडे दुर्लक्ष करू नकोस,
त्याने तुझा निषेध केल्यास खचू नकोस,
6 कारण प्रभू ज्यांच्यावर प्रीती करतात त्यालाच ते शिस्त लावतात,
आणि ज्या प्रत्येकाला पुत्र म्हणून ते स्वीकार करतात त्याला फटकेही मारतात."