Pular para o conteúdo
Publicidade

इब्री 3:7,8,12,13,15

OMRCV Marathi Contemporary Version

अविश्वासाबद्दल इशारे

7 ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो:

"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,

8 तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका,

जशी रानात परीक्षा होत असताना

तुम्ही बंडखोरी केली होती.

12 बंधू आणि भगिनींनो, आपले हृदय पापमय आणि अविश्वासू होऊन आपल्यापैकी कोणीही जिवंत परमेश्वराला सोडून जाणार नाही म्हणून जपा. 13 अद्यापि "आज" म्हटलेला जो काळ आहे तोपर्यंत, दररोज एकमेकांना उत्तेजन द्या, म्हणजे पापाच्या कपटामुळे तुमचे मन कठीण होणार नाही. 15 ज्याप्रमाणे आताच म्हटले आहे:

"आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,

तर जशी तुम्ही बंडखोरीमध्ये केली,

तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका."3:15 स्तोत्र 95:7, 8

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    7 म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे,

    "आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,

    8 तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.

    ज्याप्रमाणे इस्त्राएल लोकांनी

    अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,

    12 बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.

    13 जोपर्यंत, "आज" म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत. 15 पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे;

    "आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल,

    तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.