17 अंजिरांची झाडे ना बहरली
आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत,
जैतुनाचे सर्व पीक बुडाले
आणि शेते नापीक झाली,
जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत,
गोठ्यात गुरे नाहीत,
18 तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन;
मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.
19 सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत;
मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास
ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील.
गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.