2 याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल—
शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा,
सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा,
ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—
3 आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील.
ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत,
किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.