6 एक वाणी म्हणाली, "आरोळी द्या."
आणि मी म्हणालो, "मी काय आरोळी देऊ?"
"सर्व लोक गवतासारखे आहेत,
आणि त्यांचे विश्वासूपण वनातील फुलांसारखे आहे.
7 गवत सुकते आणि फुले गळून पडतात,
कारण याहवेहचा श्वास त्यावर फुंकर घालतो.
निश्चितच लोक गवत आहेत.
8 गवत सुकते आणि फुले गळून पडतात,
परंतु आपल्या परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते."