6 मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’
आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’
माझ्या पुत्रांना दूरवरून
आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—
7 जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो,
ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले,
ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या."