3 "याकोबाच्या वंशजांनो,
इस्राएलच्या सर्व अवशिष्ट लोकांनो, माझे ऐका,
तुम्ही जन्माला आल्यापासून मीच तुमचे संगोपन केले आहे,
आणि तुमच्या जन्मापासून मीच तुमची काळजी घेतली आहे.
4 वयस्कर होऊन तुमचे केस पांढरे होईपर्यंत
तो मी आहे, तो मी आहे जो तुम्हाला आधार देईल.
मी तुम्हाला निर्माण केले आहे व मी तुमचा सांभाळ करेन;
मी तुम्हाला आधार देईन व तुम्हाला सोडवेन.