सीयोनचे गौरव
1 "ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे,
आणि याहवेहचे गौरव तुझ्यावर उदय पावले आहे.
2 पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे,
आणि गडद अंधकार लोकांवर येत आहे,
परंतु याहवेहचा तुझ्यावर उदय होत आहे,
आणि त्यांचे गौरव तुझ्यावर प्रकट होत आहे.
3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील,
आणि राजे तुझ्या उदयाच्या तेजामध्ये येतील.