नवे आकाश व नवी पृथ्वी
17 "कारण पाहा,
मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन.
पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही,
मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.
18 परंतु मी जी निर्मिती करेन
त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा.
कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय
व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
19 मी यरुशलेमसाठी आनंद करेन
आणि माझे लोक मला आनंददायी होतील;
यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी
कधीही कानांवर पडणार नाही.