45 मग फिलिप्पाला नाथानाएल सापडल्यानंतर तो त्याला म्हणाला, "ज्यांच्याबद्दल मोशेने नियमशास्त्रात लिहून ठेवले आणि ज्यांच्याबद्दल संदेष्ट्यांनीसुद्धा कथन केले ते, येशू नासरेथकर, योसेफाचे पुत्र आम्हाला सापडले आहेत."
46 त्यावर नाथानाएलाने विचारले, "नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?"
यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, "तू ये आणि पाहा."