2 जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. 3 दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. 4 आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात.