21 "प्रभूजी," मार्था येशूंना म्हणाली, "आपण येथे असता, तर माझा भाऊ मेला नसता. 22 परंतु तरी आता जे काही आपण परमेश्वराजवळ मागाल, ते आपणास ते देतील हे मला ठाऊक आहे."
23 त्यावर येशूंनी तिला सांगितले, "तुझा भाऊ पुन्हा उठेल."
24 मार्था म्हणाली, "होय, अंतिम दिवशी, पुनरुत्थानाच्या दिवशी तो जिवंत होईल."
25 येशू तिला म्हणाले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो कोणी मजवर विश्वास ठेवतो, तो मरण पावला असला, तरी पुन्हा जगेल; 26 जो कोणी मजवर विश्वास ठेवून जगतो तो कधीही मरणार नाही. यावर तुझा विश्वास आहे काय?"
27 "होय, प्रभूजी," ती म्हणाली, "या जगात येणारा, तो ख्रिस्त (मसिहा), परमेश्वराचे पुत्र आपण आहात यावर माझा विश्वास आहे."