39 जो येशूंकडे रात्री आलेला होता, तो निकदेमही त्याच्याबरोबर होता व त्याने आपल्याबरोबर गंधरस व अगरू यांचे सुमारे चौतीस कि.ग्रॅ.19:39 मूळ भाषेत शंभर लित्रा मिश्रण आणले होते. 40 येशूंचे शरीर घेऊन त्या दोघांनी ते सुगंधी द्रव्यासह तागाच्या वस्त्राने गुंडाळले. हे यहूद्यांच्या उत्तरक्रियेच्या रीतीप्रमाणे होते.