Pular para o conteúdo
Publicidade

योहान 21:15-17

OMRCV Marathi Contemporary Version

येशू पेत्राची पुनर्स्थापना करतात

15 जेवल्यानंतर येशू शिमोन पेत्राला म्हणाले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, या सर्वांपेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतोस काय?"

तेव्हा पेत्राने उत्तर दिले, "होय, प्रभू, आपणाला माहीत आहे, की माझे तुमच्यावर प्रेम आहे."

येशूंनी त्याला म्हटले, "तर माझ्या कोकरांना चार."

16 येशूंनी पुन्हा विचारले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, तू मजवर प्रीती करतोस काय?"

पेत्र म्हणाला, "होय, प्रभू मी आपणावर प्रेम करतो, हे आपल्याला ठाऊक आहे."

येशू त्याला म्हणाले, "माझ्या मेंढरांना पाळ."

17 तिसर्‍या वेळेला त्यांनी त्याला विचारले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय?"

"तू माझ्यावर प्रेम करतोस काय?" असे तिसर्‍या वेळेस येशूंनी विचारल्यामुळे, पेत्र दुःखी झाला. तो म्हणाला "प्रभूजी, आपल्याला सर्वकाही माहीत आहे की मी आपणावर प्रेम करतो."

येशू म्हणाले, "माझ्या मेंढरांस चार.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, "योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?" तो त्यास म्हणाला, "होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो." तो त्यास म्हणतो, "माझी कोकरे चार." 16 तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, "योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?" तो त्यास म्हणाला, "होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो." तो त्यास म्हणाला, "माझी मेंढरे राख." 17 तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, "योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?" पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, "प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो." येशू त्यास म्हणतो, "माझी मेंढरे चार."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.