3 त्यावर येशूंनी उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म3:3 किंवा वरून जन्मल्याशिवाय झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही."
4 तेव्हा निकदेमाने विचारले, "जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!"
5 येशूंनी उत्तर दिले, "मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. 6 शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. 7 ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. 8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कुठून आला व कुठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे."