21 येशू तिला म्हणाले, "बाई, माझ्यावर विश्वास ठेव, अशी वेळ येईल की त्यावेळी तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात करणार नाही. 22 तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे. 23 अशी वेळ येत आहे आणि आली आहे की खरे उपासक पित्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करतील. पिता अशाच प्रकारच्या उपासकांना शोधीत आहे.