19 ते तीन किंवा चार मैल6:19 किंवा पाच ते सहा किलोमीटर अंतर वल्हवून गेले असतील, तोच त्यांना येशू होडीकडे पाण्यावरून चालत येताना दिसले, तेव्हा ते फार घाबरले. 20 परंतु ते त्यांना म्हणाले, "मीच आहे; भिऊ नका." 21 ते येशूंना होडीत घेण्यास तयार झाले आणि लागलीच ती होडी जिथे त्यांना जायचे होते त्या किनार्यास पोहोचली.