5 जेव्हा येशूंनी वर पाहिले व त्यांना एक मोठा जनसमुदाय आपल्याकडे येत असलेला दिसला. ते फिलिप्पाला म्हणाले, "या लोकांना खाण्यासाठी आपणास भाकरी कुठे विकत मिळतील?" 6 ते केवळ त्याची परीक्षा पाहत होते, कारण आपण काय करणार आहोत हे त्यांनी मनात आधी ठरविले होते.
7 फिलिप्पाने उत्तर दिले, "प्रत्येकाला एक घास तरी खाण्याएवढे अन्न विकत आणण्यासाठी अर्ध्या वर्षाच्या मजुरीपेक्षा अधिक6:7 ग्रीकमध्ये चांदीचे दोनशे दिनार तरी लागेल!"