3 येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, "तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल. 4 ज्याला प्रसिद्धी पाहिजे असा कोणी गुप्तपणे काही करीत नाही. तुम्ही या गोष्टी करीत आहात, तर जगाला प्रकट व्हा." 5 कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.