7 "परंतु जो मनुष्य याहवेहवर भरवसा ठेवतो,
जो फक्त याहेवेहवर विश्वास ठेवतो, तो आशीर्वादित असो,
8 ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत.
त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात.
या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही;
त्याची पाने सदा हिरवी राहतात.
अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही.
आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही."