9 सर्वात कपटी काही असेल तर, ते म्हणजे अंतःकरण
आणि ते बरे करण्याच्या पलीकडे आहे.
हे कळण्यास कोण समर्थ आहे?
10 "मी याहवेह, अंतःकरणे पारखतो,
आणि मनाची परीक्षा घेतो,
म्हणून प्रत्येक मानवाला त्याने केलेल्या आचरणाप्रमाणे,
प्रत्येकाला त्याच्या कर्मांप्रमाणे रास्त प्रतिफळ देतो."