31 "असे दिवस येतील जेव्हा,
इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी
मी एक नवीन करार करेन,"
याहवेह म्हणतात.
32 "मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून
त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले,
तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या
कराराप्रमाणे हा करार नसेल.
मी जरी त्यांचा पती होतो31:32 किंवा मी त्यांच्यापासून दूर गेलो,
तरी त्यांनी माझा करार मोडला."
असे याहवेह जाहीर करतात.
33 "परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा"
याहवेह जाहीर करतात, "त्या वेळेनंतर
मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन,
आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन,
मी त्यांचा परमेश्वर होईन,
आणि ते माझे लोक होतील.