Pular para o conteúdo
Publicidade

यिर्मयाह 7:30-33

OMRCV Marathi Contemporary Version

कत्तलीचे खोरे

30 " ‘याहवेह म्हणतात, यहूदीयाच्या लोकांनी माझ्या दृष्टीत पाप केले आहे. ज्या मंदिराने माझे नाव धारण केले आहे त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्ती ठेवून, ते मंदिर भ्रष्ट केले आहे. 31 बेन-हिन्नोमच्या खोर्‍यात त्यांनी तोफेत नावाची एक उच्च वेदी बांधली आहे—तिथे त्यांच्या दैवतांना ते आपल्या मुलामुलींचे होमबली देतात—अशी आज्ञा मी त्यांना मुळीच दिली नव्हती, असे भयानक कृत्य माझ्या कधी मनातही आले नाही. 32 म्हणून सावध राहा, ते दिवस येत आहे, याहवेह असे म्हणतात, लोक त्या खोर्‍याला तोफेत किंवा बेन-हिन्नोमचे खोरे असे म्हणणार नाही, परंतु कत्तलीचे खोरे हे नाव पडेल, कारण तोफेतमध्ये एवढ्यांना पुरण्यात येईल, की त्या सर्व प्रेतांना पुरण्यास जागा उरणार नाही. 33 नंतर या लोकांची प्रेते जंगली पशू व पक्ष्यांना खाद्य असे होतील, आणि त्यांना हाकलून लावण्यासही कोणी उरणार नाही.

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    30 कारण परमेश्वर असे म्हणतो, यहूदाच्या लोकांस पापे करताना मी पाहिले आहे." त्यांनी वापरण्यात नसलेल्या गोष्टी, ज्या घराला माझे नाव आहे, ते भ्रष्ट करायला ठेवल्या आहेत.

    31 आणि त्यांनी बेन हिन्नोमच्या दरीत तोफेतची उच्चस्थाने बांधली आहेत. त्याठिकाणी ते स्वत:च्या मुलामुलींना अग्नीत जाळण्यासाठी देत असत. अशी आज्ञा मी दिलेली नाही आणि असे काही माझ्या मनातही आले नाही. 32 परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत. "पुन्हा कधीही तोफेत व बेन हिन्नोमची दरी असे म्हटले जाणार नाही, तर तिला ते संहाराची दरी म्हणतील. की आणखी एका मृतालाही पुरण्यास जागा राहणार नाही इतकी वेळ येईपर्यंत ते तोफेतमध्ये मृतांना पुरतील. 33 प्रेते आकाशातील पक्ष्यांचे आणि पृथ्वीवरील पशूस अन्न असे होतील. आणि त्यांना हाकलायला तेथे कोणीही नसेल.

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.