13 आणि यहोशुआने याहवेहच्या आज्ञेप्रमाणे यफुन्नेहचा पुत्र कालेबाला यहूदाहच्या कुळाबरोबर जो वाटा दिला तो हा: किर्याथ-अर्बा म्हणजेच हेब्रोन. (अर्बा हा अनाकांचा पूर्वज होता.) 14 अनाकाचे पुत्र शेशय, अहीमान व तलमय या अनाकांच्या वंशजांना कालेबाने बाहेर घालवून दिले.