16 तेव्हा लोकांनी उत्तर दिले, "आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो! 17 याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले.
Publicidade
Publicidade