एहूद
12 एकदा पुन्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि म्हणून याहवेहने मोआबाचा राजा एग्लोनला इस्राएलावर वर्चस्व करण्यास दिले. 13 एग्लोन अम्मोनी व अमालेकींना सोबत घेऊन आला आणि त्याने इस्राएली लोकांवर हल्ला केला आणि त्यांनी खजुरीच्या झाडांचे शहर3:13 म्हणजे यरीहो ताब्यात घेतले.