येशूंच्या जन्माचे भविष्यकथन
26 अलीशिबेला गर्भवती होऊन सहा महिने झाले असताना, परमेश्वराने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावात, 27 एका कुमारीकडे पाठविले, जिचा विवाह दावीद राजाच्या वंशावळीतील योसेफ नावाच्या मनुष्याबरोबर निश्चित झाला होता. त्या कुमारीचे नाव मरीया होते.