2 येशूंनी शिष्यांना सांगितले, "अशा रीतीने प्रार्थना करा:
" ‘हे पित्या,11:2 काही मूळ प्रतींमध्ये आमच्या स्वर्गातील पित्या
तुमचे नाव पवित्र मानिले जावो;
तुमचे राज्य येवो.11:2 काही मूळ प्रतींमध्ये जसे पृथ्वीवर तसे स्वर्गात तुमच्या इच्छेप्रमाणे होवो
3 आमची रोजची भाकर प्रतिदिनी आम्हाला द्या.
4 कारण जशी आम्ही आमच्या अपराध्यांस क्षमा करतो;
तशी तुम्ही आमच्या पापांची क्षमा करा11:4 किंवा जे आमचे ऋणी आहोत
आम्हास परीक्षेत आणू नका.’ "11:4 काही मूळ प्रतींमध्ये, पण आम्हाला त्या दुष्टापासून सोडवा