Pular para o conteúdo
Publicidade

लूक 12:16-21

OMRCV Marathi Contemporary Version

16 नंतर येशूंनी एक दाखला सांगितला: "एका श्रीमंत माणसाच्या शेतामध्ये भरपूर पीक आले. 17 तो मनाशी विचार करू लागला, ‘मी काय करू? माझ्याजवळ धान्य ठेवावयास जागा नाही.’

18 "तो म्हणाला, ‘मी असे करतो. मी माझी सगळी कोठारे पाडून टाकेन आणि यापेक्षाही मोठी बांधेन, म्हणजे मला धान्य साठविता येईल. 19 आणि मी स्वतःस म्हणेन, "पुढे अनेक वर्षे पुरेल एवढ्या धान्यांचा तुझ्याकडे साठा आहे. आता विसावा घे; खा, पी आणि आनंद कर." ’

20 "पण परमेश्वर त्याला म्हणाले, ‘अरे मूर्खा! आज रात्रीच जर तुझा जीव मागितला गेला तर; जे सर्व तू स्वतःसाठी तयार केले आहे ते कोणाचे होईल?’

21 "परमेश्वराच्या मोलवान आशीर्वादांची संपत्ती मिळविण्याऐवजी, जो मनुष्य स्वतःसाठी द्रव्याचा नुसता संचय करतो, त्याचीही अशीच गत होणार आहे."

Em outras traduções

  1. IRVMAR Indian Revised Version (IRV) - Marathi

    16 नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, "कोणाएका धनवान मनुष्याच्या शेतजमिनीत फार उत्तम पीक आले. 17 तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला, ‘मी काय करू, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’ 18 मग तो असे म्हणाला, ‘मी आता असे करतो, मी माझी धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीतो, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन’ 19 आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’ 20 पण देव त्यास म्हणतो, ‘अरे मूर्खा, जर आज तुझा जीव गेला तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’ 21 जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे."

Direitos das traduções citadas

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.