येशू परूश्याच्या घरी
1 एका शब्बाथ दिवशी येशू एका प्रमुख परूश्याच्या घरी जेवावयास गेले असताना त्यांच्यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवले जात होते. 2 तिथे त्यांच्यासमोर शरीरावर असाधारण सूज असलेला एक मनुष्य होता. 3 परूशी व नियमशास्त्रज्ञ यांना येशूंनी विचारले, "शब्बाथ दिवशी बरे करणे हे नियमानुसार आहे का?" 4 परंतु ते शांत राहिले. येशूंनी त्या आजारी मनुष्याचा हात धरून त्याला बरे केले आणि जाऊ दिले.