येशूंचा जन्म
1 त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला. 2 ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती. 3 तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.
4 योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम2:4 बेथलेहेम हिब्रू भाषेनुसार बेथलेहेम येथे वर गेला. 5 नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते.