10 परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, "भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल. 11 आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे. 12 त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल."