15 देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले: "चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभूने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू."
16 ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तिथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले. 17 त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, ते सर्वठिकाणी विदित केले. 18 मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.