येशूंना अटक
47 ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला, 48 तेव्हा येशूने त्याला विचारले, "यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?"