येशूंचा बाप्तिस्मा
21 जेव्हा सर्व लोक बाप्तिस्मा घेत होते त्यावेळी येशूंचाही बाप्तिस्मा झाला आणि येशू प्रार्थना करीत असताना स्वर्ग उघडला, 22 आणि पवित्र आत्मा कबुतरासारखा शारीरिक रूपामध्ये त्यांच्यावर स्थिरावला आणि स्वर्गातून एक वाणी झाली, "तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी संतुष्ट आहे."