येशू पुष्कळांना बरे करतात
38 येशू सभागृहातून बाहेर पडल्यानंतर शिमोनाच्या घरी गेले. तिथे शिमोनाची सासू तापाने फणफणली होती, तिला मदत करावी असे त्यांनी येशूंना सांगितले. 39 त्यांनी तिच्यावर वाकून तापाला धमकाविले व तिचा ताप नाहीसा झाला. ती लगेच उठली आणि त्यांची सेवा करू लागली.