येशू बारा प्रेषितांना पाठवितात
1 जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलाविले, तेव्हा त्यांना दुरात्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. 2 नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्यांना बरे करण्यास पाठविले.