21 तरीपण आशेचा हा एक
किरण उरला आहे:
22 याहवेहच्या महान प्रीतीमुळे आम्ही पूर्णपणे भस्म झालेलो नाही
कारण त्यांच्या कृपेचा कधीही ऱ्हास होत नाही.
23 त्यांची प्रेमदया प्रतिदिवशी नवी होते;
तुमची विश्वसनीयता महान आहे.
24 मी स्वतःस म्हणतो, "याहवेह माझा वाटा आहेत;
म्हणूनच मी त्यांची प्रतीक्षा करेन."
25 जे याहवेहवर त्यांची आशा ठेवतात,
आणि जे त्यांचा शोध घेतात, त्या सर्वांसाठी ते भले आहेत.
26 याहवेहच्या तारणाची शांतपणे वाट पाहणे
हितकारक आहे.