अंजिराच्या झाडाला शाप आणि मंदिराचे अंगण स्वच्छ करणे
12 दुसर्या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली. 13 काही अंतरावर पानांनी बहरलेले एक अंजिराचे झाड त्यांच्या दृष्टीस पडले, त्यावर काही फळे सापडतील या शोधार्थ ते तिथे गेले. तिथे पोहोचल्यावर, त्यांना फक्त पानांशिवाय काही आढळले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. 14 तेव्हा येशू झाडाला म्हणाले, "तुझे फळ कोणीही कधीही न खावो." त्यांचे हे बोलणे शिष्य ऐकत होते.