24 "हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात,
" ‘सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
25 आकाशातून तारे गळून पडतील,
आणि आकाशमंडळ डळमळेल.’13:25 यश 13:10; 34:4
26 "त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील. 27 आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील.